![]() |
फोटो - पाटण नगरपंचायत सभापतीपदी निवडीनंतर राजेंद्र राऊत, सचिन कुंभार, सौ. मीनाज मोकाशी, उमेश टोळे, मुख्याधिकारी संतोष मोरे आदी मान्यवर. |
पाटण ( दिनकर वाईकर )
पाटण नगरपंचायत विशेष समिती सभापतींच्या निवडी पार पडल्या. यामध्ये राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटातील नगरसेवकांच्या सभापतीपदी वर्णी लागल्या. यामध्ये बांधकाम सभापतीपदी राजेंद्र शिवदास राऊत, पाणी पुरवठा सभापती सचिन किसनराव कुंभार, महिला व बालकल्याण सभापती सौ. मिनाज फारुख मोकाशी व शिक्षण सभापतीपदी उमेश वसंतराव टोळे यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आल्या.
बुधवारी पाटण नगरपंचायत विशेष समिती सभापतींच्या निवडी उप विभागीय अधिकारी सोपान टोम्पे, नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या. यामध्ये बांधकाम सभापतीपदी राजेंद्र राऊत यांची तर सदस्य म्हणून जगदीश शेंडे, संतोष पवार, सौ. संज्योती जगताप, सौ. शैलजा पाटील यांच्या निवडी करण्यात आल्या. पाणीपुरवठा स्वच्छता व जलनिस्सारण समिती सभापतीपदी उप नगराध्यक्ष सचिन कुंभार यांची तर स्वप्निल माने, सौ. सोनम फुटाणे, किशोर गायकवाड, सौ. आस्मा इनामदार यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ. मिनाज मोकाशी, उपसभापती पदी सौ. सुषमा मोरे यांची तर सदस्यपदी सौ. संजना जवारी, सौ. सोनम फुटाणे यांच्या निवडी करण्यात आल्या. शिक्षण, नियोजन व विकास सभापतीपदी उमेश टोळे यांची तर सदस्यपदी जगदीश शेंडे, सागर पोतदार, सौ. मंगल कांबळे यांच्या निवडी करण्यात आल्या.
या निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे सचिव अमरसिंह पाटणकर, युवा उद्योजक याज्ञसेन पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती राजेश पवार, माजी पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, पाटण अर्बन बँक चेअरमन बाळासाहेब राजे महाडिक, खरेदी विक्री संघ चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, विक्रमसिंह पाटणकर दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार, श्रीराम नागरी पत संस्था चेअरमन हिंदुराव सुतार, पाटण नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. अनिता देवकांत, दिनकरराव घाडगे, गुरुदेव शेडगे, शंकर शेडगे आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी अभिनंदन केले.





Social Plugin