Ticker

6/recent/ticker-posts

बी.पी. नरोड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बिलोलीकरांना दिल्या नाविन्यपूर्ण भेटी!



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.                             

      बिलोली येथील भूमिपुत्र असलेले सेवानिवृत्त जिल्हा कोषागार अधिकारी तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सेवा निवृत्त महालेखा अधिकारी तमन्ना पिराजी नरोड यांनी आपल्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त बिलोलीकरांना भव्य व्यायाम शाळा आणि स्विमिंग पुलची नाविन्यपूर्ण भेटी देऊन शहर विकासात आपला वैयक्तिक कार्यप्रणालीतून बहुमूल्य योगदान दिले आहे.             

  एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या बी.पी. नरोड यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेवर उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करीत प्रशासनाच्या वरिष्ठ पदावर जनसेवेला अग्रक्रम देत आता सेवानिवृत्तीनंतर देखील समाजशील विविधागी उपक्रमाला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिनांक 25 मार्च रोजी बिलोली शहरातील रवींद्र नगरात भव्य व्यायाम शाळा आणि स्विमिंग पूल च्या बांधकामाचे भूमिपूजन व उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करून शहर विकासात भर दिला आहे.

 व्यायाम शाळा आणि स्विमिंग पूल मुळे बिलोली शहरातील नवतरुणांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होऊन बलशाली युवा पिढी निर्माण होण्यासाठी मोलाची भूमिका नरोड यांची ठरणार आहे. बी.पी. नरोड यांच्या सदरील कार्यप्रणालीचे समाजातील सर्व स्तरातील नागरिकाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.