Ticker

6/recent/ticker-posts

शालेय जीवनापासून विद्यार्थी यांनी संस्कार जोपासले जावेत . - प्रा एन के . शिंदे



बुध   दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ विद्यामंदिर बुध मध्ये क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाचे माजी गुरुवर्य  .प्रा . श्री एन के शिंदे ,  प्रा . के जी देसाई ,  प्रा . श्री एम बी शिंदे . कृतज्ञता सोहळा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला .यावेळी  सरपंच सौ सुजाता बोराटे ,  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  चंद्रकांत चव्हाण , खटाव तालुका  पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष  प्रकाश राजेघाटगे , संपतराव जगदाळे सर , माजी गटशिक्षणाधिकारी मुरलीधर खराटे ,  मंगेश घाडगे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे खजिनदार अमोल खरात उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य सुरेश खराते होते .  यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी यांनी ढोल ताशाच्या गजरात उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले . क्रांतीसुर्य महात्मा फुले , शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखें , स्वामी विवेकानंद , छत्रपती शिवाजी महाराज , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवाचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्जवलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . विद्यालयाच्यां विद्यार्थिनीनी संस्थेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली . यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये कृतज्ञता सोहळा याविषयी आपले मनोगत व्यक्त केले .विद्यालयातील शिक्षक शिक्षीका व प्राचार्य यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .

. चंद्रकांत खराटे माजी विद्यार्थी यानी कृतज्ञता सोहळा आयोजनाची पाशर्वभूमी सांगितली . आज मी माझ्या जीवनात जो यशस्वी व मान स्नमानाने जीवन जगत आहे त्यामध्ये कॉलेज जीवनातील प्रा . एन के शिंदे , प्रा के जी देसाई , प्रा एम .बी . शिंदे . यांनी केलेले मार्गदर्शन व आर्थिक मदतीमुळे मला शिक्षण घेण्यासाठी सहकार्य मिळाले त्याची मी परतफेड करू शकत नाही परंतू कृतज्ञता व्यक्त करू शकतो म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे . मी नेहमी त्यांच्या ऋणात राहिल अशी भावना व्यक्त केली . सत्काराला उत्तर देताना प्रा शिंदे एन के यांनी लाजरा बुजरा विद्यार्थी चंद्रकांत व त्याची परिस्थिती याच्याविषयी माहिती मनोगता मध्ये व्यक्त केली . चंद्रकांत सारखे विद्यार्थी शालेय जीवनात संस्कार घेऊन घडले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली . यावेळी प्रा के .जी . देसाई , प्रा . एम .बी . शिंदे यांनी चंदू ( चंद्रकांत ) यांच्या विषयीचे आठवणी सांगितल्या . तसेच कॉलेजमधील प्रसंगाना उजाळा दिला ज्ञानदांनाविषयी आपले विचार मांडले तसेच बुध व बुध पंचक्रोशीमधील ग्रामस्थ यांनी त्यावेळी केलेले सहकार्य यांचे स्मरण केले . जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी मी ही विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून आम्हाला या गुरुवर्याचे मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मी  घडलो व चंद्रकांत खराटे करत असलेले सामाजिक कार्य  , विद्यार्थी यांना करत असलेली मदत याबद्दल माहिती दिली . डॉ . बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे सचिव मंगेश घाडगे यांनी आपल्या गुरुविषयी भावना व्यक्त केल्या . 

(चंद्रकांत ) याना  आम्ही लहानपणापासून आबा म्हणतोत  याचा आर्थ आज कृतज्ञता सोहळ्या निमिताने समजले . विद्यालयाचे सहशिक्षक भगवान सरवदे यानी चंद्रकात खराटे हे करत असलेले सामाजिक कार्य तसेच बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ , आजी .माजी विद्यार्थी विद्यालयास करत असलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले .    यावेळी विद्यालयाच्या वतीने चंद्रकांत खराटे व सौ कांचन खराटे यांचा संपूर्ण पोशाख देऊन प्राचार्य अंकुश भांगरे सर व सौ सविता भांगरे मॅडम यांनी त्यांचा सत्कार केला . अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य सुरेश खराते यांनी गुरु शिष्याचे नाते कसे असावे हे चंद्रकांत यांनी या कृतकता सोहळ्याच्या कार्यक्रमातून दाखवून दिले आहे . त्याप्रमाणे कार्यरत असणारे विद्यार्थी , शिक्षक यांनी आपल्या आचार , विचार व वाणीजोपासली जावी  ही भावना व्यक्त केली व कार्यक्रमाच्या निमिताने सर्वांना मंगल कामना दिल्या . यावेळी कार्यक्रमासाठी  आपतेष्ट , रेखा निकाळजे , संदिप कांबळे , अजित माने सौ ,संगिता खराटे , नेताजी भोसले , सौ साधना भोसले , ओंकार भोसले , कल्पना भोसले नातेवाईक बुध व बुध पंचकोषी ग्रामस्थ , प्राध्यापक , शिक्षक, विद्यार्थी   उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ठ  सुत्रसंचालन प्रा दत्तात्रय काळोखे यांनी केले व आभार पर्यवेक्षक  नाना दडस यांनी मानले . खराटे परिवारा मार्फत सदस्य,  सर्व विद्यार्थी .,ग्रामस्थ यांना स्वादिष्ट भोजन दिले व कार्यक्रम यशस्वी  संपन्न होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी  प्राचार्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल खराटे परिवाराकडून धन्यवाद मानले         .  

कृतज्ञता सोहळ्याच्या निमिताने मा . चंद्रकांत खराटे व सौ कांचन खराटे यांनी प्रा . एन के शिंदे , प्रा के . जी . देसाई , व प्रा . एम . बी शिंदे या तिघांना ही संपूर्ण पोशाख व प्रत्येकी 10 ग्रॅम  (एक तोळा )सुर्वण अलंकार रिंग  (आंगठी ) व स्मृतिचिन्ह देऊन गुरूदक्षिणा भेट दिली . तसेच प्राचार्य श्री भांगरे सर यांना ही विद्यालयाच्या भौतिक सुविधासाठी 55000 रु व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . या आगोदरही विद्यालयास त्यांनी दोन वर्ग 45000 रु खर्च करून डिजीटल केले आहेत तसेच विद्यालयातील विद्यार्थी दत्तक घेत आहेत तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक यांचा स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळं  देऊन त्यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .