मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी : मेडशी गावातील ज्येष्ठ नेते मा जिल्हा परिषद अध्यक्ष मुकुंदराव मेडशीकर यांच्याकडून स्वखर्चातून जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौद बांधण्यात येणार असून त्यासाठी आज टीकास मारून भूमिपूजन करण्यात आले.मेडशी गावात खूप मोठ्या प्रमाणावर पाळीव जनावरे असून येथे उन्हाळ्याच्या दिवसात मुक्या पाळीव जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असते हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर गावातील हनुमानवाडी परिसरातील स्मशानभूमीजवळ त्यांनी जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा हौद बांधण्याचा निश्चय केला व त्यासोबतच स्मशानभूमीतील येणाऱ्या गावातील नागरिकांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व हात पाय धुण्याची व्यवस्था व्हावी असा दुहेरी उद्देश नजरे पुढे ठेवून या हौदाचे बांधकाम होणार आहे.
यावर या कार्यक्रमाला गावातील मुकुंदराव मेडशीकर,सुबोध शिवाजीराव मेडशीकर,रणजीत मेडशीकर, प्रदीप तायडे,अजय चोथमल,अनिस बागवान,राजू रुस्तमराव घुगे,कैलास ढाले,अभिजित मेडशीकर,मोहन राठोड,संतोष मेटागे,बबन घुगे,सचिन घुगे,संतोष शर्मा,सुनील खंडेलवाल, दत्तराव घुगे, दौलत मुचलंबे, निशांत मेडशीकर यांच्या सह गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.





Social Plugin