Ticker

6/recent/ticker-posts

कोणतेही कार्य सुरू करताना देवाचे नाव घेतल्यास जीवनात यश हमखास मिळते - ह.भ.प. कृष्णा महाराज सरनाईक



सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे 

 सिंदखेडराजा :- तालुक्यातील राहेरी बु, गावामध्ये तब्बल 7 वर्षानंतर आंखड हरिनाम सप्ताह प्रारंभ कोणतेही शुभ काम करतांना  किंवा कामाचा शुभारंभ करतांना जीवनात यशस्वी होण्यासाठी देवाचे नाव घेऊन त्या कामाचा शुभारंभ करावा असे प्रतिपादन आयोजित राहेरी बु येथील अखंड हरिनाम सप्ताह निमित्त ह. भ. प. कृष्णा महाराज सरनाईक यांनी प्रथम कीर्तनातून केले.

आरंभी आवडी आदरें आलें नाम  !तेणें सकळ सिध्दि जगीं जालें पूर्ण काम ॥ रामकृष्ण गोविंद गोपाळा!!तूं माय माउली जिवीं जिव्हाळा !तुझियेनि नामें सकळ संदेहो फ़िटला!!बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाद्वारे उपदेश करतांना महाराज पुढे म्हणाले संपत्तीचा कधीही गर्व करू नका.संपत्ती ही दुपारच्या सावली प्रमाणे असते. पुस्तक वाचल्याने मस्तक ठिकाणावर येते म्हणून नेहमी वर्तमानपत्र, साहित्य कादंबरी किंवा आपल्या आवडीची पुस्तके वाचली पाहिजे. असेही महाराज म्हणाले.

यावेळी किर्तनाला गायनसाथ ह. भ. प. प्रमानंद देशमुख महाराज यांनी मंत्रमुग्ध केले. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सकाळचे जेवण दत्ता परुळकर तर संध्याकाळचे जेवण मदन देशमुख यांच्याकडे होते किर्तन संपल्यानंतर संत दुनियादास भजनी मंडळी चे भक्तीमय भजन झाले.