बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकासह शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे असून सजगता व प्रेरणेच्या प्रभावातून पुणे येथील सार्थक फौन्डेशनच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे फौन्डेशन चे संस्थापक, संचालक प्रदीप नामजोशी यांनी सांगितले . सार्थक वेलफेअर व आदित्य बिर्ला कॅपिटल फौन्डेशनच्या संयुक्त सहकार्यातून उभारलेल्या डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहाच्या शालार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी बुध येथील सर्वोदय संस्थेचे संस्थापक जीवन इंगळे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक लवकुमार मदने, सार्थक चे सिध्देश पुरंदरे , सुभाष मोहोळ, संग्राम मदने, तसेच सामाजिक कार्यकर्ते वसंत काटकर , रविराज घाडगे मुख्याध्यापक आर एम डांगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री अविनाश जंगम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले . यावेळी श्री नामजोशी म्हणाले, ' ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरेश्या सोयी - सुविधा नसतानाही प्रगल्भतेच्या जोरावर जिद्द चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्नाने उज्वल कामगिरी करत आहेत. सार्थक वेलफेअर च्या माध्यमातून शाळेस पायाभूत सुविधांची पूर्तता केली जात असून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सायन्स लॅब ची उभारणी, दुर्बल घटकातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते .यावेळी श्री जीवन इंगळे म्हणाले, जागतिक तापमान वाढ समस्या असून पर्यावरणासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. व्यायामासाठी सायकल चालवा, इंधन वाचवा चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे नियमित वाचन करावे. कार्यक्रमास तालुका शिक्षकेतर लिपिक संघटनेचे अध्यक्ष बलराम घोरपडे, ज्येष्ठ शिक्षक सुनील वायदंडे, दत्तात्रय चव्हाण , सौ.संगिता कर्णे, सौ.माधवी गोडसे , सौ.वैशाली फडतरे , पुरुषोत्तम सावंत, अशोक माने, संताजी जाधव आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. विलास काटकर यांनी आभार मानले.श्री अविनाश जंगम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
Social Plugin