Ticker

6/recent/ticker-posts

आता तरी अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश द्या वाई तालुक्यातील हतबल शेतकरी



वाई प्रतिनिधी, राहुल देशमुख 


वाई तालुक्यातील आसले गावातील डोंगर शिवारात दिनांक ३/४/२०२५ रोजी गुरुवारी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचा मोठा कहर झाला. ज्यामुळे शेकडो एकर ऊस पीकाचे मोठे नुकसान झाले आहे.

   काल मोठया पावसामुळे शेकडो एकर उभ्या ऊसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले. आसलेचे प्रगतिशील शेतकरी अमित पिसाळ यांनी सांगितले की, माझ्या 5 एकर जमिनीत आडसाली ऊसाची लागवड केली होती आणि दोन एकर जमीनीत गहू लावगड केली होती. पण मोठ्या पावसामुळे ही पीके खराब झाली आहेत. त्यांनी आरोप केला की, नुकसानीचे आकलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कुणीही आमच्याशी संपर्क केला नाही. पीडित शेतकर्‍यांनी सांगितले की, मागे पाऊस झाला नव्हता, जेव्हा याची आवश्यकता होती आणि त्यांनी आडसाली उसासाठी अतिरिक्त पैसा खर्च करावा लागला आणि आता अवकाळी पाऊस आणि वादळामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. तरी जिल्हाप्रशासनाकडून कोणतेच अधिकारी तलाठी अथवा कृषी अधिकारी यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत जिल्ह्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्या मतदारसंघातील अधिकारी तरी कसे निघरघट्ट याचा प्रत्यय आला.