मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
राजुरा - अनुसूचित जाती मधुन मातंग समाजाला स्वतंत्र अबकड वर्गीकरणात आरक्षण द्यावे या मागणी साठी २०मे रोजी मुंबई येथे राज्यभरतातील सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या बाबतचे मालेगाव तालुका सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने ४ एप्रिल रोजी मालेगाव तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले
माजी पंचायत समिती सदस्य तथा सकल मातंग समाज जिल्हा समन्वयक विनोद जोगदंड यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सर्वोच्य न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी ७ न्यायधीशाच्या न्याय पीठाने अनुसुचीत जातीच्या १३% आरक्षणाचे अ ब क ड वर्गिकरनास मान्यता देऊन उपवर्गीकरणाचे सर्व अधिकार राज्य शासनास बहाल केले आहेत त्यानुसार महाराष्ट्र शासनाने न्यायममुर्ती बदर समीती स्थापन केली, परंतु आज पर्यंत समीतीने काही केलेले नाही असे दिसुन येत आहे त्यामुळे मातंग समाजाला हक्क आणि अधिकारा पासून वंचित राहावे लागत आहे. न्यायमूर्ती बदर समीतीने अ ब क ड वर्गिकरनाची कार्यवाही येणारे शैक्षणिक सत्र सुरू होण्या पूर्वी तात्काळ करुन अनुसूचित जाती मधुन मातंग समाजाला वेगळं अ ब क ड मध्ये आरक्षण द्यावे, यासाठी २० मे २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातून किमान पाच लक्ष्य मातंग समाज एकत्र येऊन महाराष्ट्र शासनास आरक्षण उपवर्गीकरण लागु करण्यास भाग पाडण्यासाठी आंदोलन करणार आहेत निवेदन देते वेळी समन्वयक विनोद जोगदंड,कैलास थोरात, यशवंत हिवराळे, पंकज गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव दाभाडे, अॅड भुषन साठे,शिरपूर ग्रामपंचायत सरपंच सिधुबाई कांबळे, कृष्णा गायकवाड, शंकर खंडारे,पंकज थोरात, दुर्गा एंगड, राजेश पाटोळे,विलास कांबळे, गजानन दाभाडे, मधुकर गायकवाड,माधव कांबळे, आत्माराम वानखेडे,विजय नितनवरे, रमेश डोंगरे, यांच्या सह शेकडोंच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती
या सभेला उपस्थित सकल मातंग समाज बांधवांना आरक्षण उप वर्गीकरणा (अबकड) बाबत २० मे रोजी मुंबई येथे आयोजित जन आक्रोश मोर्चाच्या पुर्व तयारी संदर्भात समन्वयक यशवंत हिवराळे( पत्रकार लोकमत) यांनी मार्गदर्शन केले





Social Plugin