Ticker

6/recent/ticker-posts

कांगठी येथील भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी शेषेराव वाघमारे तर उपाध्यक्षपदी पत्रकार गौतम वाघमारे यांची निवड



बिलोली प्रतीनीधी गणेश कदम.


बिलोली तालुक्यातील मौजे कांगठी येथील भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी शेषेराव वाघमारे तर उपाध्यक्षपदी गौतम वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बिलोली तालुक्यातील कांगठी येथे दरवर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.दरवर्षी जंयती उत्सव समितीने वेगवेगळे उपक्रम साजरे करत असतात त्या अनुषंगाने याही वर्षी २७ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत असल्यामुळे जंयती महोत्सवाच्या अध्यक्षपदी शेषेराव वाघमारे तर उपाध्यक्षपदी पत्रकार गौतम वाघमारे यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्ष.संजय वाघमारे, सल्लागार माधव वाघमारे, मिरवणूक प्रमुख, प्रकाश वाघमारे,भुंजग वाघमारे, पिराजी वाघमारे,आदी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.