गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महाराष्ट्र महिला विभागीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्वेसर्वा भगवंत सेवक धर्मनेता किसन राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार, धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज यांच्या शुभाशीर्वादाने व शुभहस्ते तसेच राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र अध्यक्ष प्राचार्य विलास राठोडसर यांच्या प्रमूख उपस्थितीत नवनियुक्त महिला विभागीय अध्यक्ष पदाची सौ अश्विनीताई महेश राठोड यांना नियुक्ती पत्र देऊन महिला विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
भारतातील गोर बंजारा समाजातील अग्रगण्य मानली जाणारी राष्ट्रीय बंजारा परिषद ही प्रसिद्ध उद्योगपती धर्मनेता किसन राठोड यांच्या कल्पक बुद्धी आणि दूरदृष्टीतुन उदयास आलेली संघटना आहे. ही संघटना गोर बंजारा धर्मसत्ता, राजसत्ता, साहित्यसत्ता, शैक्षणिक आणि प्रशासकीय सत्ता मिळविण्याच्या हेतूने कार्य करत आहे. संघटनेचे महाराष्ट्रासह इतर राज्यात सर्वदूर जाळे पसरलेले असुन समाजाच्या न्याय हक्क अधिकार व सन्मानासाठी सदैव तत्पर असते. अशा या संघटनेच्या अमृत महिला विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सौ अश्विनीताई महेश राठोड यांनी स्वीकारली.





Social Plugin