प्रतिनिधी @ समाधान भुतेकर
महाराष्ट्रातील एकमेव संत चोखोबा संस्थान असलेल्या ईसरूळ येथे पुण्यतिथी निमित्त दरवर्षी भव्य दिव्य व महाराष्ट्रतील नामवंत सप्तहाचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी देखील सालाबादप्रमाणे 10मे ते 18 मे 2025 या कालावधीत कीर्तन महोत्सव व भव्य भव्य शिवचरित्र सोहळा पार पडणार असून सदर सोहळयाची निमंत्रण पत्रिका ह. भ. प.पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी माँ जिजाऊ चरणी अर्पण करून नियोजनास सुरवात करण्यात आली असून सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राची लाडके मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.तसेच प्रत्येक दिवशी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तने व आयोध्या येथील राम मंदिराचे कोषाध्यक्ष प. पूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतुन शिवचरित्र कथन केले जाणार आहे. तरी तमाम महाराष्ट्रातील भावीक भक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहून शोभा वाढविण्याचे आव्हान हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील व ईसरूळ ग्रामवासी यांनी केले आहे.





Social Plugin