Ticker

6/recent/ticker-posts

वाहतूक कोंडीने ओझर्डे- जोशिविहिर परिसर त्रस्त ???? बांधकाम विभागाने योग्यती खबरदारी घ्यावी



वाई प्रतिनिधी, राहुल देशमुख 

      सविस्तर वृत्त असे की सुरुर ते वाई या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे त्यामुळे पाचगणी महाबळेश्वर कडे जाणारी वाहने ही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहेत ती सध्या वाई ओझर्डे मार्गे जोशीविहिर अशी जात असून ओझर्डे गावातील ब्रिटिशकालीन पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे त्यात अवजड वाहने, बस, कंटेनर, वाळू खडी वाहतूक करणारे डंपर यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या भल्या मोठया रांगा लागलेल्या दिसत आहे रस्ता ओलांडण्यासाठी 20 मिनिटे वाट बघावी लागतं आहे.

 त्यात उन्हाळ्यामुळे ओझर्डे स्टँड परिसरात खुप मोठी वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळं शाळेत येणारी जाणारी मुले,नागरिक यांना ही वाहतूक कोंडी जीवाशी घोंगावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.बांधकाम विभागाने योग्य ती खबरदारी घेउन उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नाहीतर सुरूर- वाई रस्ता चांगला करता करता ओझर्डे - वाई रस्त्याची चाळण होऊ नये एवढीच मागणी ग्रामस्थ करत आहेत.