[ पोखरातुन मिळणार शेतकऱ्यांना भरघोस अनुदान ]
सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा तालुक्यातील सोयंदेव या गावात दि 4/4/2025 रोजी पोखरा समितीसाठी ग्रामसभा घेण्यात आली . या ग्रामसभेमध्ये एकमताने पोखरा समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. सोयंदेव ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित ग्रामसभेत कृषी सहाय्यक एस.एन.नागरे व ग्रामविकास अधिकारी कु. के. पी.राठोड हे उपस्थित होते. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच रूक्मिणी ईलग, सदस्य पदी रमा राम खरात , हिम्मतराव रायभान जाधव , ज्ञानेश्वर नाथा वाघ , नंदाताई सखाराम कायंदे, फकिरा सखाराम जावळे, भगवान आबाजी वाघ, राम दशरथ खरात, वंदना देवानंद नागरे, शिवनारायण दत्तात्रय नागरे, सत्यभामा मदन वाघ, शितल सिध्देश्वर देशमुख , राहुल दादाराव कायंदे, ॠषिकेश राजेश खरात, केशव सुखदेव मुंढे , मदन काशीनाथ आघाव, शिवाजी रामराव नागरे तलाठी, गिरणारे मॅडम तलाठी, एस .एन नागरे कृषी सहाय्यक, कु. के. पी . राठोड ग्रा . पं . अधिकारी वरील सर्वांची पोखरा समितीच्या विविध पदावर गावकऱ्यांनी ग्रामसभेतुन नियुक्ती केली आहे. कृषी सहाय्यक एस एन नागरे यांनी पोखरा योजने संदर्भात सविस्तर माहिती सांगून विविध योजनांचा उल्लेख त्यामध्ये केला असून सर्व टीमला मार्गदर्शन केले आहे.





Social Plugin