Ticker

6/recent/ticker-posts

हनुमान जयंतीनिमित्त आज यात्रोत्सवाचे आयोजन



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा (लाड):हनुमान जयंतीनिमित्त १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजतापासून मूर्तिजापूर • रस्त्यावरील श्री हनुमान मंदिर, भीलखेडा येथे भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन - करण्यात आले आहे.

भिलखेडा येथील हनुमान मंदिर असंख्य राम व हनुमान भक्तांचे श्रद्धास्थान असून, याठिकाणी दर शनिवारी भाविक येऊन नतमस्तक होतात. दरवर्षी येथे हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त हनुमान जयंती दिनी

सायंकाळी भव्य यात्रा भरते. ही यात्रा कारंजा शहरातील सर्वात मोठीयात्राअसते. यावर्षी देखील यात्रा भरवण्याचे नियोजन करण्यात आहे आहे. याशिवाय हनुमान जयंती निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळणार आहे. या अनुषंगाने संस्थानच्या विश्वस्तांनी प्रसादाची आणि दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी यात्रा उत्सवात सहभागी व्हावे तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.