*पिंपळदरा येथील जि. प. शाळेचे विद्यार्थी.शिक्षक,व केंद्रप्रमुख यांनी दिली भेट*
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
काळाकामठा:दि 07/04/2025 रोजी काळा कामठा येथील आदिवासी आश्रम शाळा येथे कृतिशील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथील विद्यार्थी शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी भेट दिली असता विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन कशाप्रकारे जोपासावा हे स्व कृतीतून,व प्रयोगातून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले . त्याचबरोबर आधुनिक जगामध्ये वाचनाचे महत्त्व खूपच कमी झाले आहे. त्यासाठी सुसज्ज ग्रंथालय असणे व त्या ग्रंथालयाचा शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकडून नियमित वापर होणे पण खूप गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अनेक नेते.समाजसेवक. क्रांतिकारी व तज्ञ व्यक्ती यांची आत्मचरित्रे व लिखाण केलेली पुस्तके. तथा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची पुस्तके नियमित वाचन करावे या हेतूने अनेक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना कम्प्युटर कक्षेची पाहणी व निरीक्षण द्वारे संगणकाची माहिती व संगणकाचे विविध प्रोग्राम याबद्दल माहिती व महत्व पटवून देण्यात आले. या निमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या मनामधील विविध प्रश्नांची उत्तरे शिक्षकां च्या मार्गदर्शना तुन शोधली. तथा शिक्षणाच्या बळावर भविष्यात देशहितासाठी कोणी इंजिनिअर. डॉक्टर आयएएस तर कोण सैनिक होऊन आपले भावी जीवन घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहू अशा स्वरूपात विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अल्प उपहार. शितपेय.शरबतचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित निरीक्षक श्री सोनुने सर, मस्के सर. मा.मुख्याध्यापक श्री डोंगरदिवे सर.प्रा. मुख्याध्यापक श्री राम कदम सर लॅब असिस्टंट गादेवार सर.रोहित सर.झाडके सर.घाटोळे सर.मांजरे सर या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवन प्रकाशमय व उज्वल विकसनशील करण्याच्या दृष्टिकोनातून विविध विषयांवर मार्गदर्शन केले.






Social Plugin