बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देगलूर येथील भीम गीतांच आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक अशोक कांबळे यांनी केले आहे. गेल्या दहा वर्षापासून फुले शाहू आंबेडकर युवा मंचाच्या वतीने देगलूर शहरांमध्ये क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंती साजरी केली जाते. यंदा दहा वर्षे पूर्ण होऊन अकराव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त फुले शाहू आंबेडकर युवा मंचाच्या वतीने 10 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात फेम मंजुषा ताई शिंदे यांचा गीतांचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला आहे. तरी देगलूर शहर परिसरातील जनतेने जास्तीत जास्त समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजक अशोक कांबळे यांनी केले आहे.





Social Plugin