बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे .
विद्यालायाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वी च्या 33 विद्यार्थ्यांना एन एम एम एस परीक्षेला बसवले .त्यापैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . कु . बोराटे ऐश्वर्या अशोक व फडतरे श्रेयस सखाराम ह्या दोन विद्यार्थ्यांना एन एम एम एस शिष्यवृत्ती प्राप्त झाले . ह्या विद्यार्थ्यांना 12000 रु प्रत्येकी 4 वर्षे मिळणार आहेत . तसेच 6 विद्यार्थी याना सारथी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत . गोडसे प्रणव आबासो , जगदाळे आदर्श रविंद्र , पवार समर्थ शिवाजी , जगदाळे श्वेता मुंकुद , सातपुते समर्थ नंदकुमार , गोडसे वेदांत विलास या विद्यार्थ्यांना 9600 रु प्रत्येकी 4 वर्षे मिळणार आहे .
या सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन प्राचार्य अंकुश भांगरे , प्रभारी पर्यवेक्षक दडस नाना ,सरपंच सुजाता बोराटे , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण , माजी प्राचार्य शेखर घाटगे , पत्रकार प्रकाश राजेघाटगे तसेच प्राध्यापक , शिक्षक -शिक्षीका , शिक्षकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले . या सर्व यशस्वी विद्यार्थी यांना NMMS विभाग प्रमूख श्री सरवदे भगवान प्रभाकर , श्री नारागुडे नितीन सुधाकार , श्री काळे नवनाथ दिगांबर , श्री दडस नाना तात्याबा , श्री पाटील तानाजी महादेव , कचरे अंजली महेंद्र या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे . तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शिक्षक पालक संघ , माता पालक संघ , शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य , बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .
.





Social Plugin