Ticker

6/recent/ticker-posts

कोणत्याही समाजाची समाजाप्रती निष्ठाअसणे गरजेचे -माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख



बुध  दि. [प्रकाश राजेघाटगे ]

शिकलगार समाज हा प्रगतीकडे चालला असून, या समाजातील  विद्यार्थ्यांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. याखेरीज विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्याची संकेतही मोठ्या प्रमाणात  वाढ होऊ लागली आहे. ही समाजासाठी लक्षणीय वेध घेणारी गोष्ट आहे. समाज एकत्रित आला तर प्रगती निश्चित होते हे या मेळाव्याच्या रूपाने सिद्ध झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फिरोज शेख यांनी केले.

  लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे पीर लाल शाहबाज कलंदर उरूसानिमित्त शिकलगार समाजाचे अधिवेशन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ दिनांक सहा रोजी घेण्यात आला होता यावेळी फिरोज शेख हे बोलत होते.

    फिरोज शेख हे बोलताना पुढे म्हणाले " मी या समाजामध्ये वावरलो असून, समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवराशी माझा संबंध आला आहे. हा समाज मेहनतीने पुढे आला असून, समाजाची समाजाप्रती असणारी निष्ठा व समाजामध्ये असणारी एकसंधता 

 संघटनेची बांधणी व विद्यार्थ्याप्रती असणारी शैक्षणिक दृष्टी संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांची वाखाणण्याजोगी असून, त्यांच्या या प्रयत्नांना याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात समाजाने पाठिंबा देण्याची गरज आहे. तर याहीपेक्षा उज्वल यश निश्चितच प्राप्त होईल असे मत व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांनी बोलताना सांगितले, समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेचे प्रमाण वाढत असून तसेच विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे ही आमच्यासाठी गर्वाची बाबअसून, कै. याकूब बाबा,  कै. मकबूल आबा, रसूल मास्तर, रज्जाक गुरुजी  यांनी रचलेल्या संघटनेच्या पायाला कळस बसवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करत असून आम्ही करत असलेल्या कामाचे फळ समाजाच्या माध्यमातून मिळत आहे. 

यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष याकूब शिकलगार यांनी कै.याकूबबाबा यांचे जीवनावर संघटनेसाठी  असलेले कार्य याची माहिती देऊन त्यांचे जीवनचरित्र यावर पुस्तिका लिहिणार असल्याचे सांगितले, यासाठी समाजाचे व संघटनेचे योगदान पाठीशी मिळावे अशी ही यावेळी अपेक्षा व्यक्त केली. संघटनेचे सचिव चंदू सर यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह विविध स्पर्धा परीक्षा याचे मार्गदर्शन मिळावे यासाठी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना संघटनेच्या माध्यमातून  मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणची योजनाही चालू करण्यात येणार असल्याचे सांगून ते त्वरित अमलात आणण्यात येईल हे स्पष्ट केले.यावेळी पीएसआय सलीम शिकलगार, नाविकाधिकारी समीर शिकलगार, गणिसर यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी दहावी व बारावीच्या 25 हून अधिक विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र  व रोख पारितोषिक देऊन संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार व विविध मान्यवरांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला. 

त्याचबरोबर विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य कमावलेल्या उच्चपदस्थ विद्यार्थ्यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाज लेंगरे, ग्रामपंचायत लेंगरे, सांगली जिल्हा मुस्लिम शिकलगार समाजाच्या वतीने अधिवेशनाच्या कार्यक्रमासाठी नेटके नियोजन करण्यात आले होते. तसेच दोस्ती ग्रुप विटा यांच्यावतीने सायंकाळी राज्यातील समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शिकलगार जमात ट्रस्ट, व युवा संघटना मुंबई यांनीही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.