भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे सुशीकरांचे आवाहन .
प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई(बीड ): -ता.२०/०४स्वानंद सुखनिवासी संत कुलभूषण महात्मा श्री नगद नारायण महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सुशी (वडगाव) येथे प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी महंत ह.भ.प.वै.महादेव महाराज यांच्या आशीर्वादाने व महंत ह.भ.प.गुरुवर्य शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या प्रेरणेने व महंत ह.भ.प. दत्तात्रय महाराज गिरी व श्री ह.भ.प.महंत संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ३८ व्या अखंड हरिनाम सप्ताह व गाथा भजन व भागवत कथेस रविवार दि.२० एप्रिल रोजी प्रारंभ झाला आहे. तरी भाविकांनी पावन हनुमान मंदिर, सुशी येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ तसेच सप्ताह कमिटी सुशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील पहाटे ४ ते ६ काकडा, ७ ते ८ विष्णु सहस्त्रनाम, १० ते ११ गाथा भजन, ११ ते २ श्रीमद भागवत कथा ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन व नंतर जागर होईल. सप्ताहात भागवताचार्य जगदिशानंद महाराज शास्त्री यांची श्रीमद् भागवत कथा होईल तर या सप्ताहात पुढीलप्रमाणे किर्तन सेवा रविवार दि.२० एप्रिल ह.भ.प.कुमार म.ठोसर, सोमवार दि.२१ माऊली म.सजगने, मंगळवार दि.२२ प्रल्हाद म.महालकर, बुधवार दि. २३ लक्ष्मण महाराज पाटील , गुरुवार दि.२४ सतिष म. ऊरणकर, शुक्रवार दि.२५ ह.भ.प. संभाजी महाराज , शनिवार दि.२६ श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानचे महंत दत्ता म.गिरी तर रविवार दि.२७ एप्रिल रोजी दुपारी ११ ते १ यावेळेत ह.भ.प.महंत प्रेममुर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज नारायणगडकर यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद वाटप होईल तरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुशी (व) पंचक्रोशी परिसर व समस्त ग्रामस्थ मंडळ सुशी (व) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Social Plugin