बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील गावचे ज्येष्ठ नागरिक समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी निवृत्त कर्मचारी तथा प्रगतशील शेतकरी हनुमंतराव भिकाजी चोरमले यांचे दि. १८ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर घुंगर्डे हादगाव येथे अतिशय शोकाकुल वातावरणात दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळीं १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.स्व. हनुमंतराव चोरमले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ,सुना, नातवंडे, पुतणे असा खुप मोठा चोरमले परीवार आहे.माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे विश्वासू पांडुरंग चोरमले यांचे ते वडील होते.
Social Plugin