Ticker

6/recent/ticker-posts

कलंदर बाबा यात्रा महोत्सव ईसरूळ 22 एप्रिल ला निघणार संदल.



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक ईसरूळ येथील कलंदर बाबा देवस्थान हे सर्व जाती धार्मचे श्रद्धास्थान असलेल एक पंचक्रोशीतील देवस्थान असून दरवर्षी येथे यात्रेचे आयोजन अगदी पूर्वी पासून करण्यात येते. यावर्षी सुद्धा सालाबदाप्रमाणे 22 तारखेला मंगळवारी सायंकाळी 5:00 वाजता ढोल तश्याच्या व नागऱ्याच्या गजरात वाजत गाजत भाविकांच्या उपस्थितीत उंटावरून भाविकांच्या दर्शनासाठी संदल निघणार आहे तरी भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी सदर दिवशी बाहेर गावावरून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सरपंच सतीश पाटील याच्या कडून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच यात्रेसाठी येणाऱ्या सर्व व्यपाऱ्यांना दुकानासाठी जागेची व्यस्था करून दिली जाणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी हे आव्हान ईसरूळ गावकरी व मुजावर शे. रज्जाक यांनी केलेआहे.