Ticker

6/recent/ticker-posts

हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी



  पाटण (दिनकर वाईकर) 

 पाटण व परिसरात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावात  साजरी करण्यात आली  हनुमान जयंती निमित्ताने पाटण जवळील सुंदरगडावर  ऐतिहासिक ठेवा असलेल्या खंजीर दरवाजातील कातळात कोरलेल्या हनुमान मूर्तीवर पंचगंगा, दुग्धाभिषेक अर्पण करून पुजा करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी बजरंग गर्जना, शिवगर्जना घोषणांनी जयघोष केला. तत्पूर्वी सुंदर स्वराज्य प्रतिष्ठान, सुंदरगड संवर्धनाच्या मावळ्यांनी खंजीर दरवाजा व परिसराची स्वच्छता केली.

यावेळी तेथील  श्रीहनुमान व श्रीगणेश मूर्तींवर अभिषेक करुन फुलांची पूजा मांडण्यात आली. व सर्व  भाविकांच्या उपस्थित सुंदरगडावर हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक भाविकांनी गड व गड परिसर पाहण्याचा आनंदही घेतला. यासह परिसरातील पाटण येथील रामापूर हनुमान मंदिर, लायब्ररी चौक हनुमान मंदिर, पोलिस वसाहत हनुमान मंदिर, ब्राम्हणपूरी हनुमान मंदीर यासह विविध ठिकाणी उत्साहाच्या वातावरणात भाविकांनी मोठ्या उत्साहात व भक्ती भावात हनुमान जयंती साजरी केली.