Ticker

6/recent/ticker-posts

कलगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी



ग्रामीण प्रतिनिधी अक्षय काळबांडे 

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच न्याय, समता आणि बंधुतेचा अनोखा संगम! त्यांच्या विचारांनी लाखो लोकांचे जीवन उजळवले, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ दिलं. दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरी होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फक्त एक स्मरण दिन नव्हे, तर हा दिवस आहे प्रेरणेचा, परिवर्तनाचा आणि आत्मपरीक्षणाचा. भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीत, तर प्रत्येक वंचित घटकाला आपलं हक्काचं स्थान दिलं. 

कलगाव येथील नागरिकांनी एकत्र येत बाबासाहेबांना मानवंदना दिली . क्रांतीसुर्य विहारामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि ग्राम पंचायत च्या वतीने बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सरपंच अस्मिताताई मनवर, अमोल मनवर,अलिमोद्दीन सर, गजानन अंबेकर,बबू भाई,भारत मनवर, अनिल भगत, रामराव मनवर, राजपाल बनसोड,बंडू मनवर, श्रीकांत गायकवाड, आकाश मनवर ,विवेक अंबेकर  इकरमोद्दीन  शमशोद्दीन  रोहित  गावातील इतर सर्व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरुणांनी विशेष प्रयत्न केले