Ticker

6/recent/ticker-posts

परभणी जिल्ह्यात घुमला 'स्वरसम्राट' चा आवाज



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

दिनांक २१एप्रिल २०२५ रोजी फुले आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त स्वरसम्राट ' गायन संच,मेहकर यांचा प्रबोधनात्मक गायन कार्यक्रम, नागठाणा ता.शेलू जि.परभणी येथे संपन्न झाला.यावेळी ' स्वरसम्राट ' गायन संच,मेहकर यांनी गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. कलावंतांनी महापुरुषांची गीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.एकता,बंधुता, सामाजिक सलोखा, फुले आंबेडकर कार्य अशा विविध प्रबोधनपर गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. गायक शाहीर भिमराव अंभोरे, साहेबराव अंभोरे, दत्ता पवार, संदीप बोदडे, यांच्या सुरेल गायन व शेरोशायरीने उपस्थितांची मने जिंकली.

     यावेळी गायकांनी निळ्या पाखरांची वंदना भिमराया, सोनियांची उगवली सकाळ, दोनच राजे, लाल दिव्याच्या गाडीला ,घेतो मोकळा श्वास भीमजयंतीमुळे, घालून सूट बुट टाय, तुम्ही खाता त्या भाकरीवर, कुणी नाही केलं भलं व माय भीमानं केलं, ही जयभीमवाली पोरं, रमाने हा पती घडविला , पहा पहा मंजुळा, मैं भीम का दिवाना हुं, भीम आवडीन बोले रामू रामू रमाईला अशी एक से बढकर एक गीते सादर केली.आकाश मोजतो आम्ही या गीतानंतर सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

    कोरस पार्वता सुरडकर,आशा टेकाळे यांनी दिला.तर महाराष्ट्राचे प्रख्यात बॅन्जो वादक संदीप बोदडे,ढोलकपटू अशोक जावळे, राहुल पवार आणि हार्मोनियम वादक साहेबराव अंभोरे यांच्या तालबद्ध वादनाने कार्यक्रम दर्जेदार आणि बहारदार झाला.

      कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी  राजू शेजुळ, अर्जुन शेजुळ,मच्छिंद्र शेजुळ, पंचशील नवयुवक मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सामाजिक सलोखा व एकता यासाठी या गावाची ओळख आहे हे विशेष.