Ticker

6/recent/ticker-posts

मुरूम माफिया व रेती माफियाची तहसीलदार यांना जिवे मारण्याची धमकी



प्रतिनिधी : राजेश दामोदर : 

अकोला जिल्हयामध्ये  वाळू माफिया, तसेच मुरूम माफिया या लोकांच्या नेहमी करीता धमक्या येत असतात. तहसील कार्यालय पातूर येथे काही मुरूम माफिया लोकांनी येऊन पातूर तहसील चे नायब तहसीलदार श्री बळीराम चव्हान हे कार्यरत असताना यांच्या दालनात येऊन काही लोकांनी त्यांना बेइज्जत करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. असे पोलिस स्टेशन पातूर तेथे तक्रारीत नमूद केलेले आहे.

 दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 12 चे सुमारास नायब तहसीलदार यांचे दालनात येऊन सचिन निमकाले रा. असोला व त्यांचे 4- 5 सहकारी असे एकत्र येऊन तहसील चे गाडीवर असलेला कंत्राटी ड्रॉवर मुजडीन खान, यांची तोंडी तक्रार करीत असताना त्या पाच जना पैकी एकाने बाहेरून अरविंद पाटील, प्रहार हे बोलतात म्हणून मोबाईल तहसील दरांचे हाती दिला असता . त्यांनी अश्लील शब्दात शिवी गाळ करून गाडी सहित तहसीलदार यांना पेटून देणार, जिवे मारणार असे तक्रार कर्त्याणी तक्रारीत नमूद केले आहे. हा जबानी रिपोर्ट 21 एप्रिल चे रात्री 3- 4 वाजता घेण्यात आला होता. नायब तहसीलदार यांनी कारवाईची मागणी केली आहे . अनुसूचित - जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधीनियम 1989 व सुधारित नियम 2016 अंतर्गत, ३(१) Q आणि R अनवये या सर्वावर कठोर कारवाही ची मागणी तक्रार दरानी केली आहे.   पुढील तपास पोलिस स्टेशन पातूर चे ठाणेदार  करीत आहेत.