समितीचा लढा कुठल्याही धर्माविरुद्ध नसून शोषितांविरुद्ध आहे -प्राचार्य सविता शेटे.
तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/ गेवराई
गेवराई,(बीड )दि. ९ -गेली जवळपास बारा वर्ष बंद अवस्थेत असलेल्या गेवराई येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या समितीचे पुनर्गठण करण्यात आले असून अध्यक्षपदी सर्वानुमते ज्येष्ठ नाटककार तथा पुरोगामी विचारवंत ॲड .कमलाकर देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली . रविवार दि . ६ एप्रिल रोजी आर . के .कोचिंग क्लासेसच्या सभागृहात आयोजित बैठकीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यवाह तथा विवेक वाहिनी राज्याध्यक्षा प्राचार्य डॉ . सविताताई शेटे, विवेक जागर प्रकाशन विभागाचे बीड शाखेचे कार्यवाह विजय घेवारे, सत्यशोधक समाजाचे महासचिव ज्येष्ठ विधीज्ञ ॲड . सुभाष निकम व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती .
या बैठकीस प्रमुख मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सविताताई शेटे म्हणाल्या की, ९ ऑगस्ट १९८९ रोजी नरेंद्र दाभोळकरांचे विचार घेऊन चालवली जाणारे शिस्तबद्ध संघटन, कुणाच्याही आर्थिक मदतीशिवाय चालणारी समिती म्हणून नावलौकिक आहे .समितीने सुचवलेले जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हे दोन कायदे भारतात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आले . अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, प्रचार अंगीकारणे , विधायक ,कृतिशील कार्य करणे, धर्माची कालसुसंगत चिकित्सा करणे, संत महंतांचा विचार व संविधानाचा मूल्यात्मक आशय कृतिशील करणे, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठल्याही धर्माच्या पंथांच्या विरोधात नाही, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक ॲड सुभाष निकम यांनी केले तर समितीची भूमिका सतीश आत्राम यांनी मांडली . सविस्तर चर्चा होवून गेवराई शाखेची कार्यकारिणी प्राचार्य डॉ . सविताताईंनी जाहीर केली .
गेवराई अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी ॲड . कमलाकर देशमुख ,उपाध्यक्ष ॲड. सुभाष निकम, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे, कार्याध्यक्ष धर्मराज करपे ,प्रधान सचिव सतीश आत्राम, विविध उपक्रम विभाग महेंद्र मवाडे, वैज्ञानिक जाणिवा शिक्षक प्रकल्प विभाग संतोष कोठेकर ,बुवाबाजी संघर्ष विभाग विजय सांगळे, प्रशिक्षण व्यवस्थापन विभाग तात्यासाहेब मेघारे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग प्रताप देशमुख, निधी व्यवस्थापन विभाग सिडाम प्रेमदीप, महिला सहभाग विभाग रवी मडावी, युवा सहभाग विभाग रोहन पंडित, सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग सतीश पल्लेवाड, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग नितीन कुलथे, कायदेविषयक व्यवस्थापन विभाग ॲड . संदेश पोतदार, जात पंचायत मूठमाती अभियान विभाग भगवान कोळी, मिश्र विवाह प्रोत्साहन विभाग अनिल शिंदे, जोडीदाराची विवेकी निवड विभाग किसन बांगर ,सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग दीपक पुरी, विज्ञान बोध वाहिनी नितीन वाळके , विवेक वाहिनी विभाग गोकुळ गिरी ,राष्ट्रीय समन्वय विभाग हरिभाऊ घोडके, दस्तावेज संकलन विभाग सतीश आत्राम आदींची निवड करण्यात आली . यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते .





Social Plugin