[ ग्रामदैवत झेंड्याची आई भवानी की जय च्या गजरता दुमदुमली नगरी...राहेरी बु ,येथे हनुमान जन्मोत्सव चैत्र पोर्णिमेच्या दिवशी सोंगाची परंपरा गावाकऱ्यांनी जोपासली ]
सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बु, येथे हनुमान जन्मोत्सव निम्मिताने दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री 9 ते पहाटेच्या सकाळी 4 वाजेपर्यंत सोंग सुरू आसतात सुरुवातीला झाडझुडी सोंगापासुन सुरूवात झाली त्या नतंर लिंबाड्याच सोंग, श्री गणपती सोंग ,श्री महादेव पार्वती सोंग, सर्जा सोंग, भस्मया सुर भान्या सुर सोंग, मच्छली सोंग,नंदी सोंग, राजा प्रधान सोंग,श्री भक्त प्रल्हाद सोंग ,सूर्यनारायण सोंग, श्री राम ,लक्ष्मण सोंग,मारिच मामा सोंग,इंद्रजित सोंग,मारूती ,जटाऊ ,नल ,निल ,सुगरिव,अंगद,हनुमान सोंग त्यानंतर रावणताटी सोंग, हे सर्व आपल्या सोंगाची रंग रंगोटी करून गावात रात्रभर सोंगाड्या दफडयाच्या तालावर आप आपले नृत्य सादरीकरण करतात रात्रभर एका मागे एक सोंग नाचुन आनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा गावाकऱ्यांनी जोपासली रात्र भर चालणारे सोंग पाहण्यासाठी आलेल्या गावातील व आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांची सुरक्षिततेसाठी किंनगाव राजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनोद नरवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सतिष दधरे व सानप, पोलीस कर्मचारी उपस्थित होते
13 एप्रिल रोजी आज सकाळी पहाटेच्या 4 वाजेच्या सुमारास देवीचे सोंग निघालेदेवीचे सोंग संपूर्ण गावात प्रदक्षिणा घालत गावकऱ्यांनी गल्ली मध्ये आप आपल्या दरात सडा घालुन सुंदर रांगोळी काढुन देवीच्या सोंगाचे स्वागत करून मनोभावे दर्शन घेतले. अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा गावाकऱ्यांनी मोठ्या उत्साहत पार पाडत झेंड्याची देवीचे सोंग काढून दफडयाच्या तालावर देवीचं सोंग संपूर्ण गावात प्रदक्षिणा घालत सर्व महिला देवीच्या सोगांची औक्षण करतात शेकडो सुवासिनी देवीला ववाळुन देवीची पिस, खण ,नारळाने ओटी भरतात गावात चौकात देवीचे सोंग पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते दफडे चा आवाज गावभर घुमत होता आई भवानीचे सोंग डोळ्यांचे पारणे फोडणारा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील व गावातील नागरिकांची प्रचंड गर्दी असते
प्रदक्षिणा पार पडली गावातील असंख्य भावीक देवीला नवस करतात आणि या दिवशी पूर्ण करतात असंख्य दफड्याचा आवाज आई भवानी की जय असा जयघोष कानावर पडला की सर्वांचेच पाय जागेवर थरथरू लागतात.आई भवानी की जय असे नारा देत सकाळी 11 वाजता सर्व गावकरी मंडळी वाजत गाजत गावातील देवीचे मंदिरापुढे सोंगाची सांगता





Social Plugin