Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई विलेपार्ले जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी!



  *मालेगाव दिगंबर जैन समाजाकडून तहसीलदारांना निवेदन.*

मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

 मालेगाव :दि 24/04/2025 विलेपार्ले (पूर्व),मुंबई येथील अधिकृत दिगंबर जैन मंदिर महापालिकेने बेकायदेशीरपणे पाडल्याच्या निषेधार्थ मालेगाव (जहांगीर) येथील श्री १००८ वृषभनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व सकल दिगंबर जैन समाजातर्फे दि.२४ एप्रिल रोजी तहसीलदार साहेब यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.

    मुंबई महापालिकेने १६ एप्रिल २०२५ रोजी विलेपार्ले येथील जैन मंदिर जमीनदोस्त केल्यामुळे देशभरातील जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे मुंबई उच्च न्यायालयाने मंदिर न तोडण्याबाबत दिलेली स्थगिती आदेश असतानाही ही कारवाई करण्यात आली, हे अतिशय गंभीर आहे त्यामुळे संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करून जैन मंदिर पुनर्निर्माणाची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात यावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली जैन समाज हा देशाच्या विकासात योगदान देणारा, शांतताप्रिय आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारा अल्पसंख्याक समाज आहे त्यामुळे त्याच्या धार्मिक भावना व श्रद्धास्थानांशी खेळ करणे हे शासनास व प्रशासनास शोभणारे नाही यामागे बिल्डर लॉबीचा हात असल्याची शंका निवेदनात व्यक्त करण्यात आली असून सरकारने याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे .या निवेदन देताना तुषार कान्हेड, कैलास कान्हेड, धीरज कान्हेड, नितीन कान्हेड, विकी रोकडे, पंकज रोकडे, अमित डहाळे, प्रदीप सावले तसेच ट्रस्टचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व समस्त सकल दिगंबर जैन समाज,मालेगाव येथील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.