ग्रामपंचायत सदस्य मात्र मिस्टर इंडिया
प्रतिनिधी/दादा जाधव
सध्या खामगाव ता.फलटण येथील खामगाव तसेच काळुबाई नगर व परिसरातील पाणी पुरवठा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे महिला वर्ग व ग्रामस्थ त्रस्त झाला असून आक्रमक होताना दिसून येत आहेत तसेच काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी बसवावे अशी मागणी होत आहे
ग्रामसेवक साहेबांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे पत्र देऊन हात वर केले आहेत व पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सर्वस्वी सरपंच व सदस्य यांचा अंकुश पाहिजे असे सांगितले आहेत तर ग्रामपंचायत सदस्य मात्र मिस्टर इंडिया झाल्यासारखे दिसत आहेत अन्यथा जनतेच्या हातात कारभार देऊन सर्वानी घरी बसावे
जनतेने कोणाच्या तोंडाकडे बघायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे यावर तोडगा निघून पाणी पुरवठा सुरळीत व्हावा हीच सर्व सामान्य जनतेची भावना आहे





Social Plugin