Ticker

6/recent/ticker-posts

श्री नाईकबा देवाच्या यात्रेस मोंठ्या उत्साहात सुरुवात

 


पाटण (दिनकर वाईकर) 

पाटण तालुक्यातील श्री नाईकबा देवाच्या वार्षिक यात्रेस आज मोंठ्या उत्साहात सुरुवात झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो भाविकांची बनपुरीतमोठ्या प्रमाणात  गर्दी झाली असून,नाईकबाच्या नावांन  चांगभलच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. बैलगाड्या, पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांच्या निनादात यात्रेचा शुभारंभ झाला.

आज (ता. ३) श्री नाईकबा देवाचा नैवेद्य सोहळा पार पडणार आहे. मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली असून, संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. उद्या (ता. ४) सकाळी भव्य पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि   जल्लोषात काढण्यात येणार आहे. 

यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या साठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. जादा एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. यात्रेच्या काळात  सुरळीत  पार पडण्यासाठी  पोलिस, ग्रामपंचायत, श्री नाईकबा देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा समिती यांनी विशेष तयारी केली आहे.भाविक भक्ताचा  उत्साह आणि  बनपुरीतले वातावरण भक्तिरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.