प्रतिनिधी--संजय भरदुक मंपिर,
मंगरूळपिर- मा.बाबुसिंगजी महाराज, धर्मगुरू तथा आमदार. विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या सन २००६ ते २०१३ मधील सरळ खरेदीधारक यांना ८३२ कोटी रुपये सानुग्रह निधी वितरणाचा कार्यक्रम वाशीम येथे मा. मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते तथा मा. ना. गिरीश महाजन जलसंपदा मंत्री व मा. बाबुसिंगजी महाराज धर्मगुरू तथा आमदार विधानपरिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशीम येथे होणार असून या कार्यक्रमास संबंधित मंत्री सर्व आमदार, खासदार आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती च्या वतीने गेले पाच वर्षापासून अमरावती येथे प्राणांतिक उपोषण, हिवाळी अधिवेशन नागपूर येथे विराट मोर्चा, विदर्भातील सर्व जिल्ह्यात विविध आंदोलने,आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन, अशा प्रकारे वाशीम जिल्हा तथा विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी अनेक वेळा आंदोलने केलीत. परंतु याची पाहिजे त्याप्रमाणात शासनाने दखल घेतली नाही.
शेवटी दि. २५ जुन २०२४ रोजी मा. बाबुसिंगजी महाराज धर्मगुरू तथा आमदार विधानपरिषद यांनी समिती शिष्टमंडळ यांचे समवेत मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर बैठक आयोजित केली. या प्रसंगी मा.ना. फडणवीस साहेब यांनी धर्मगुरू बाबुसिंगजी महाराज यांचा मनोभावे सत्कार केला. बैठकीत विदर्भातील सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्त यांना सानुग्रह निधी देण्यात यावे याबाबत तसेच ईतरही समस्यांबाबत सखोल चर्चा झाली. तेव्हा ना. फडणवीस साहेब यांनी धर्मगुरू यांचे कथन मोठ्या आस्थेने ऐकून घेतल्यानंतर महाराजांना सांगितले की, विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना निश्चिंतपणे मानविय द्रृष्टिकोनातून सानुग्रह निधी दिला जाईल.
त्यानंतर दि. २४ सप्टेंबर २४ रोजी मंत्रालय मुंबई येथे कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर ची बैठक ना. फडणवीस साहेब यांनी आयोजित करुन त्यामध्ये विदर्भातील अमरावती विभागातील वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती तर नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील १६६३३ हेक्टर जमीन ला ८३२ कोटी रूपये म्हणजे हेक्टरी ५ लक्ष रुपये सानुग्रह निधी मंजूर करण्याबाबतचा ठराव केला व तसे परिपत्रक निर्गमित करण्याचे आदेश दिलेत.
परंतू विधानसभा निवडणूक आचार संहिता घोषित होणार हे स्पष्ट झाले मात्र परिपत्रक निर्गमित होण्याचे चित्र दिसत नव्हते. सर्वांना चिंता वाटत होती. आचार संहिता लागू झाल्यास परिपत्रक निघणे अशक्य हे लक्षात घेऊन समितीने तात्काळ पावल ऊचलली आणी
दि. १५ ऑक्टोबर २४ रोजी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती चे जेष्ठ मार्गदर्शक साहेबरावजी विधळे काका यांचे नेतृत्वात एक शिष्टमंडळ नागपूर येथे श्री. सोनटक्के साहेब, कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या कार्यालयात तर दुसरे शिष्टमंडळ समिती अध्यक्ष मनोज तायडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे मा.मंत्री महोदय याचे कार्यालयात अक्षरशः ठाण मांडून बसलेत आणी संबंधितांकडून परिपत्रक प्राप्त करून घेतले. शेवटी त्यानंतर अवघ्या १ तासाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. अशाप्रकारे सर्वानीच सुटकेचा निश्वास सोडलाय.
विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मा. बाबुसिंगजी महाराज धर्मगुरू तथा आमदार विधानपरिषद यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे व समिती शिष्टमंडळ यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना विश्वासात घेऊन चिकाटीने पाठपुरावा केला हे वास्तव होय. तेव्हा या ८३२ कोटी सानुग्रह निधी वाटपाचा शुभारंभ वाशीम येथे व्हावा याकरिता केन्द्रीय समिती ची समिती चे जेष्ठ मार्गदर्शक साहेबरावजी विधळे काका यांचे निवासस्थानी अमरावती येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे मा. बाबुसिंगजी महाराज धर्मगुरू तथा आमदार विधानपरिषद यांचे नेतृत्वात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती शिष्टमंडळ मुंबई ला निधी वाटपाचा कार्यक्रम निश्चित करण्याकरिता रवाना झाले आहेत.
विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना मंजूर झालेले ८३२ कोटी रुपये सानुग्रह निधीचे लवकरच वितरण, वाशीम येथे होणार असल्याचे बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती चे अध्यक्ष मनोज तायडे, तथा कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर यांनी सांगितले.





Social Plugin