कोरेगाव विधानसभा मतदार संघातल्या विद्यार्थ्यांच्या घरोघरी,स्टडी सेंटरला भेट देवून पुस्तकांचे वाटपपीपल्स रिपब्लिकनचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश उबाळे यांची पायाला भिंगरी
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
शिक्षणाच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या पटलावर नाव कोरले. त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यांचीच 134 वी जयंती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश उबाळे, आमदार महेशदादा शिंदे युवा मंच, राहुल बर्गे मित्र समुहृ रमेश उबाळे मित्र समुह यांच्यावतीने नो डीजे, नो डान्स, ओन्ली एज्युकेशन हेच ब्रिद घेवून कोरेगाव विधानसभा मतदार संघातल्या एमपीएसी, स्पर्धा सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांना पुस्तके भेट दिली. पुस्तकांची भेट देण्यासाठी रमेश उबाळे यांची सकाळपासून पायाला भिंगरी लावून कोरेगाव विधानसभा मतदार संघ पिंजून काढला आणि खऱ्या अर्थाने त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अंमलबजावणी केल्याची प्रचिती आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाची सुरुवात सातारा जिह्यातील श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलमधून झाली होती. दि. 7 नोव्हेंबर 1900 ला त्यांनी शाळेत प्रवेश केला. ते सदरबाजार येथील आमणे बंगला ते हायस्कूल असा चिमूकल्या पावलांनी प्रवास करत शिक्षण घेत होते. त्यांच्या शिक्षणाची ज्या मातीतून सुरुवात झाली. त्याच मातीत त्यांची जयंती शैक्षणिक जयंती साजरी करण्याचा निर्धार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दुध आहे. ते प्राशन केल्यावर गुरगुरल्याशिवाय रहाणार नाही. शिक्षण हा समाजाचा आत्मा आहे. मुलांना आणि मुलींना ही ज्ञानगंगा उपलब्ध करुन देणे ही गरज आहे. शिक्षणसारखा दुसरा गुरु नाही. समाजाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. अशी शिक्षणाची महती डॉ. बाबासाहेबांनीच सांगितली आहे.
त्यामुळे केलेल्या निर्धारानुसार समाजातील उपेक्षित, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना पुस्तके, शैक्षणिक साहित्य देण्यासाठी जयंतीच्या दिवशी रमेश उबाळे यांनी सुरुवात केली. सकाळपासून त्यांनी पायाला भिंगरी लावून कोरेगाव मतदार संघातील विद्यार्थ्यांच्यापर्यंत शैक्षणिक साहित्य पोहचवण्यासाठी त्यांनी कार्य केले. जे विद्यार्थी एमपीएससी, स्पर्धा परीक्षा, पोलीस, आर्मी यासह विविध सरकारी नोकरीकरता अभ्यास करत आहेत. परंतु खर्चिक पुस्तके घेवू शकत नाहीत, अशांना पुस्तके देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी केलेला हा निर्धार पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत आमदार महेशदादा शिंदे युवा मंच, राहुल बर्गे मित्र समुहृ रमेश उबाळे मित्र समुहही होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने नो डिजे, नो डान्स ओन्ली एज्युकेशन या प्रमाणे त्यांनी 134 वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.
मनस्वी धन्य झालो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेताना जे कष्ट घेतले ते वाचल्यानंतर अंगावर रोमांच उभे रहाते. शिक्षणाची महती त्यांनी सांगितली आहे. शिक्षणाने समाज मुख्य प्रवाहात येईल हे त्यांनी सांगितले गेले. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करताना मनस्वी मी धन्य झालो.





Social Plugin