बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
बिलोली तालुक्यातील अटकळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. १४ एप्रिल १८९१ रोजी महामानव यांचा जन्म झाला. समाज परिवर्तनाचे महानायक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञावंत प्रज्ञासूर्य महामानवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले पाहिजे. सामाजिक न्याय बंधुता समता या तीन मूल्यावर संविधान चालत असतो. म्हणून या उद्देशाने या भारत देशात व जगातील स्तरावर मोठी जयंती साजरी करण्यात येते. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रथमत: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण शिवाजी पाटील डोंगरे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी डी. आर. हंबीरे, पत्रकार विलास शेरे, शिवलिंग गायकवाड, बालाजी भालेराव, अफजल शेख, मारोती गायकवाड, नारायण पांचाळ, सलीम शेख आदी उपस्थित राहून महामानवास अभिवादन करण्यात आले.





Social Plugin