तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
. गेवराई( बीड ) दि .०५ - शेतात जाण्यासाठी रस्ता - पाणंद मार्ग नसल्याने बंगाली पिंपळा ता . गेवराईच्या शेतकऱ्याने भारताच्या केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना हेलिकॉफ्टर खरेदी करण्यासाठी १० कोटी रुपये कर्ज मंजूर करावे ,अशा आशयाचे निवेदन पाठवले आहे . गेवराई तालुक्यातील शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांनी कृषिमंत्री ना . शिवराजसिंग यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
मी अल्पभूधारक गरीब शेतकरी पुत्र आहे. गट नंबर १३४१ मध्ये माझ्या मालकीची एक हेक्टर ६२ आर जमीन आहे .शेतात बैलगाडी .ट्रॅक्टर. शेती अवजारे .बी बियाणे आणि रासायनिक खते नेण्या - आणण्यास अडचण निर्माण होत आहे तसेच शेतीमाल आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे . गाडी बैल शेतात ने आण करता येईल असा कायमस्वरूपी रस्ता मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये शेती साठी रस्ता देणे बाबत दि. १६/ १२/ २०११ रोजी लेखी अर्ज गेवराई महसूल विभागास सादर केला होता .
दि. १६/0 १/ २०२५ रोजी लेखी निवेदन सादर केले होते परंतु अजूनपर्यंत दखल घेतली गेली नाही .मी गरीब आहे . रोज मजुरी केली तरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे .
कृषी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे शेती करता यावी यामध्ये रस्ते, विहीर,शेत दूरस्थ,सिंचन, गोदाम,कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असल्यामुळे मुलांचे शिक्षण,आरोग्य या सर्व आर्थिक परिस्थितीत मी हतबल झालो आहे . शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मला हेलिकॉप्टर खरेदी साठी कर्जाची आवश्यकता आहे . हेलिकॉप्टरने शेतात येणे जाणे करून शेती करु शकतो. कृषी पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत १० कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी पत्र राजेंद्र नवले यांनी केली आहे . निवेदनाच्या प्रती माहितीस्तव ना .देवेंद्रजी फडणवीस , मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई,
ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ,ना . चंद्रशेखर बावनकुळे , महसूलमंत्री , महाराष्ट्र राज्य ,ना. माणिकराव कोकाटे , कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य, कृषी आयुक्त कृषी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे , जमाबंदी आयुक्त आणि संचालक , भुमिअभिलेख मुख्यालय महाराष्ट्र, राज्य पुणे. यांना शेतकरी पूत्र राजेंद्र बाबुराव नवले यांनी पाठविल्या आहेत .





Social Plugin