Ticker

6/recent/ticker-posts

स्व.नितीन बबनराव फुरसुले यांचे मरणोत्तर नेत्रदान



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

 कारंजा (लाड) चवरे लाईन, कारंजा (लाड) येथील रहिवासी स्व.नितीन बबनराव फुरसुले यांचे वयाच्या ५२व्या वर्षी ,शुक्रवार दि ४ एप्रिल २५रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निधनानंतर  फुरसुले कुटुंबाने आपल्यावरील दुखाचा डोंगर बाजुला सारून त्यांची पत्नी कांचन फुरसुले ,मुलगा तनुष फुरसुले ,मुलगी अनुष्का,भाऊ नीरज फुरसुले, यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला.

अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक यांना सचिन फुरसुले यांनी संपर्क केला. दिशा आय बँक चे डॉ अजय कांत, शिरीष चवरे यांच्या मार्गदर्शनात दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे  हिमांशू बंड,शुभम काजे ही मंडळी तात्काळ कारंजा येथे येऊन डॉ विजय जवाहरमलानी ,डॉ सुशील देशपांडे,डॉ संजय किटे, प्रफुल्ल वानखडे,प्रज्वल गुलालकरी,अभिजित मुधोळकर यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. 

यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे प्रविण फुरसुले ,नितिन काळे,प्रकाश फुरसुले,चंद्रशेखर फुरसुले,दिलीप उन्होने,दीपक फुरसुले,प्रशांत फुरसुले, प्रणिता फुरसुले पूजा फुरसुले,संगीता फुरसुले,अंजली काळे शुभांगी फुरसुले,सोनाली फुरसुले, सुलभा फुरसुले,प्रज्ञा फुरसुले,

सदस्य उपस्थित होते. नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी फुरसुले कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले व  स्व.नितीन बबनराव फुरसुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.