Ticker

6/recent/ticker-posts

श्रीराम नवमीच्या शुभक्षणी किनगाव राजा ग्रामपंचायतीकडून पाण्याच्या शुद्धतेकडे भक्कम पाऊल!



*RO-UV वॉटर एटीएम प्रकल्पाचा शानदार शुभारंभ – ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*


*सिंदखेडराजा प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर तिकटे


सिंदखेडराजा :-  तालुक्यातील किनगाव राजा ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या RO-UV तंत्रज्ञानावर आधारित वॉटर एटीएम प्रकल्पाचे लोकार्पण श्रीराम नवमीच्या पवित्र दिवशी, रविवार, ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात पार पडले.

या उपक्रमाचे उद्घाटन मा. आमदार मनोजभाऊ कायंदे यांच्या बंधू मा. सतीशभाऊ कायंदे यांच्या शुभहस्ते झाले.

कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच  प्रकाशभाऊ मुंढे, उपसरपंच श्रीमती अर्चना झोरे, व सदस्य श्री. दीपक पडुळकर, श्री. सखाराम हरकळ, श्री. भगवान साळवे, श्री. संतोष काकड, श्री. योगेश चतुर, श्रीमती प्रतिभा जाधव, श्री. राजश्री जाधव तसेच पुजा चौरे सहप्रतिष्ठित नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

या प्रकल्पामुळे गावातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाणी RO-UV तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत काळानुरूप ठरला आहे. ग्रामपंचायतीचा हा जनहितकारी पुढाकार गावाच्या आरोग्य, स्वच्छता आणि विकासाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.