Ticker

6/recent/ticker-posts

श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी हायस्कूलचा एस. एस. सी .मार्च 2025 परीक्षेचा निकाल शंभर टक्के



बुध दि .[प्रकाश राजेघाटगे] 

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी या शाळेचा एस .एस.सी. मार्च 2025 परीक्षेचा शेकडा निकाल शंभर टक्के लागला असून प्रथम क्रमांक कु . दिव्या संतोष जाधव 90.80 ,द्वितीय क्रमांक कु अंजली सचिन शिंदे 85.20% ,तृतीय क्रमांक कु रिया आनंदा मसुगडे 84.60% एवढे गुण प्राप्त करून उत्तम यश संपादित केले आहे. डोंगरी भागातील या शाळेने 100% निकालाची परंपरा यावर्षी देखील अबाधित राखली आहे .

सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादित केले आहे . या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव ,उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव , सचिव मोहनराव जाधव ,खजिनदार लक्ष्मणराव जाधव ,सर्व संस्था विश्वस्त व पदाधिकारी तसेच गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी जयंतराव जाधव ,एस आर पाटील, के डी पवार सर, डी पी शिंदे सर  मुख्याध्यापिका सौ माया पाटील  मॅडम ,उपशिक्षक सौ सारिका पाटील ,श्री सचिन गिरी गोसावी, सौ स्नेहा मदने, श्री अभंग नंदकुमार तसेच शाळा व्यवस्थापन समिती ,माता पालक संघ ,पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.