बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
डिस्कळ येथील श्री शिवाजी विद्यालयाचा दहावीचा सेमी इंग्रजी माध्यमाचा 100 % निकाल लागला असून कु.विधी सुनील फडतरे हीने 95.80 % गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला.डिस्कळ येथील श्री.शिवाजी विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( इ.दहावी ) चा सेमी इंग्रजी माध्यमाचा 100% तर एकूण निकाल 92.30% लागला.
उज्वल यशाचे पहिले पाच मानकरी पुढीलप्रमाणे
1 ) फडतरे विधी सुनील ( 95.80 %)
2 ) भुजबळ धीरज उत्तम ( 92.20 %)
3 ) पठाण अरमान बशीर ( 89.80*)
4 )कुंभार प्रज्वल निवास ( 89.60 )
5 ) मदने वैष्णवी विक्रांत ( 87.20 )
*परीक्षेसाठी विद्यालयाचे एकूण 39 विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी 17 विद्यार्थ्यांनी (डिस्टिंक्शन) विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रदीप गोडसे , उपाध्यक्ष डॉ.अजय घाडगे , सचिव प्रा.श्री.सुनील दळवी संस्थेचे सर्व संचालक, सदस्य तसेच मुख्याध्यापक आर.एम.डांगे तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.





Social Plugin