Ticker

6/recent/ticker-posts

कलाकार स्टुडिओज आणि अभिनय अकादमी चेंबुर मुंबई साई कलारत्न पुरस्कार २०२५ ने सन्मानित


       कलाकार स्टुडिओज आणि अभिनय अकादमी चेंबुर मुंबई  यांना साई कलारत्न पुरस्काराने सन्मानित

देगलूर - प्रतिनिधी - जावेद अहेमद

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२५ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शिर्डी येथे दिनांक ३ मे२०२५ शनिवार रोजी शिर्डीत हॉटेल शांतीकमल येथे करण्यात आले होते. कलाकार स्टुडिओज आणि अभिनय अकादमी चेंबुर मुंबई श्री विजय खुरपे व माया खुरपे यांना त्यांनी सामाजिक क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास प्रसिध्द हॉटेल व्यवसायिक व समाज सेवक.मा.श्री. किशोरजी कालडा शेठ संगमनेर, दिग्दर्शक मा.श्री. अल्ताफ शेख पुणे, प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गव्हाणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. हा पुरस्कार दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सुनीता जाधव यांनी पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख सुदाम संसारे यांचे आभार मानले.