Ticker

6/recent/ticker-posts

उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड स्टाफ व अंबड पोलीसांची अंबड हद्दीमध्ये विविध ठिकाणी मटका जुगारवर छापा मारुन एकुण 64,530/-रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन एकुण 16 आरोपींवर 04 गुन्हे दाखल




अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

पोलीस ठाणे अंबड हद्दीत दिनांक 21/05/2025 रोजी गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की,अंबड हद्दीमध्ये विविध ठिकाणी मटका जुगार चालु असल्याची माहीती मिळाल्याने सदरबाबतची माहीती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांना देवुन आम्ही सपोनि अमोल गुरले सोबत पो.हे.कॉ.फलटणकर,पो.शि.भिसे,मुंढे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबड येथील पो.हे.कॉ.गायके,पो.ना.जाधव,घोडके,पो.शि. राऊत,देशमाने असे टिम बनवुन संयुक्तीकपणे अंबड शहरातील सरकारी दवाखाना रोड,नाथ्रेकर चौक, महाराष्ट्र वेस,देशी रोड या ठिकाणी छापा मारुन मटका जुगार खेळत व खेळवित असलेले आरोपीना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन मटक्याच्या साहीत्यासह एकूण 64,530/-रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन सदरबाबत अंबड पोलीस ठाणे येथे आरोपीवर कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये विविध 04 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सदरची कामगीरी श्री अजय कुमार बंसल पोलीस अधिक्षक जालना,श्री अयुष नोपाणी अप्पर पोलीस अधिक्षक जालना,श्री विशाल कृष्णा खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अंबड प्रभारी अधिकारी अमोल गुरले सहा.पोलीस निरीक्षक, पो.हे.कॉ.फलटणकर,पो.शि.भिसे,मुंढे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उप विभाग अंबड येथील पो.हे.कॉ.गायके,पो.ना.जाधव,घोडके,पो.शि. राऊत,देशमाने यांनी पार पाडलेली आहे.