Ticker

6/recent/ticker-posts

अटकळी किशोर माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम; बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 97.29 टक्के.



बिलोली प्रतिनिधी गणेश कदम. 

बिलोली तालुक्यातील अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी कला शाखा बोर्ड परीक्षेचा निकाल ९७.२९ टक्के लागला असून त्यामध्ये एक विशेष प्राविण्यसह   २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून बारावी कला शाखेच्या बोर्ड परीक्षेस ३७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.  बसलेले सर्व विद्यार्थीपैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल  ९७.२९ टक्के लागत शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

शाळेच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांतून कु.  प्रीती मोहन गोनशेटवड ७७.८३ गुण घेत शाळेतून सर्वप्रथम आली तरद्वितीय कु गंगासागर मष्णाजी सगरोळे ७१.३३ टक्के, तृतीय कु. पोलकमवाड बालिका संजय व मंगरूळे गौरव शेषेराव हे  ६९.३३ टक्के समान गुण मिळवत तृतीय आले आहेत. प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यासह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  माधवराव पाटील शेळगावकर, सचिव संजय पाटील शेळगावकर व शाळेचे प्राचार्य  आटकळे राजेश्वर यांनी अभिनंदन केले आहे.