Ticker

6/recent/ticker-posts

सोमवारी लग्न, गुरुवारी सीमेवर!



प्रतिनिधी दीपक गुरव@  चाळीसगाव 


                                    खेडगाव नंदीच्या जवानाचे कर्तव्याला प्राधान्य

    कासोदा: सन २०१७ मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील याचे ५ मे रोजी शुभमंगल झाले. देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्याला त्वरेने बोलावणे आले आहे. लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेला नंदीचे खेडगाव येथील मनोज ज्ञानेश्वर पाटील हा ८ मे रोजी सीमेकडे रवाना होत आहे.

पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही, तोच सरकारने मनोज यास कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले आहे. कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोजला गर्व आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही, अशा भावना मनोजने व्यक्त केली.