पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि
कारंजा स्थानिक प्रोफेसर कॉलनी येथील रहिवासी स्व. शांतादेवी श्रीवल्लभ बंग यांचे २१ मे रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्ध वृद्धापकाळाने निधन झाले. निधनानंतर बंग कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजुला सारून त्यांचा मुलगा राजेश बंग, रविन्द्र बंग यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले.
दिशा आय बँकचे डॉ. शार्दूल डोंणगावकर, शेखर बंग यांच्या मार्गदर्शनात दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे हिमांशू बंड, अनिल देशमुख ही मंडळी तत्काळ कारंजा येथे येऊन डॉ. विजय जवाहरमलानी, डॉ. उल्हास काटोले यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे शिरीष चवरे, प्रज्वल गुलालकरी, अनुप परळीकर, किशोर बंग, प्रविण बंग, सुनीता बंग, भावना बंग, स्मिता बंग, हेमा बंग, गोपाल बंग सदस्य उपस्थित होते. नेत्रदानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एजुकेशन फाऊंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी बंग कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले. व स्व. स्व शांतादेवी श्रीवल्लभ बंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली





Social Plugin