सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे
*सिंदखेडराजा* :-भारतीय जनता पार्टीच्या सिंदखेडराजा तालुकाध्यक्षपदी आनंद रुस्तुमराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश दादा मांटे यांनी सर्वानुमते नियुक्ती केली आहे. या आधी ही त्यांनी युवामोर्चा तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि भाजप तालुका सरचिटणीस म्हणूनही काम केले. तेव्हापासून त्यांचे भारतीय जनता पार्टीसाठी दिलेले योगदान लक्षात घेता तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करून योग्य संधी दिल्याचे मत अनेक दिग्गज व जाणकारांनी व्यक्त केल्याचे चर्चेतून ऐकवास मिळते.
त्यांच्या या निवडीबद्दल अनेक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला असून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Social Plugin