Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये लावला वॉटर कूलर



कारंजा लाड पराग कु-हे प्रतिनिधि 

प्रकाश डहाके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला भेट कारंजा, (लाड) येथील उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा वॉटर कूलर बंद अवस्थेत असल्याची माहिती आ. सई डहाके यांना मिळताच त्यांनी रुग्णसेवक रमेश देशमुख यांना माहिती दिली. तसेच तत्काळ थंड पाण्यासाठी रुग्णालयात वॉटर कूलर बसविण्यास सांगितले. त्यानुसार आता शासकीय रुग्णालयात वॉटर कूलर बसविण्यात आला असून रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना थंड पाणी मिळत आहे. कारंजा उपजिल्हा रुग्णालयात सुरुवातीपासूनच प्रकाश डहाके प्रत्येक प्रश्नावर किंवा कोणत्याही बाबीवर

विशेष लक्ष ठेवत होते. त्यांच्यामुळेच आज 100 खाटांची भव्य इमारत कारंजामध्ये उभी आहे. त्यांचाच वारसा पुढे नेत आ. सई डहाके यादेखील रुग्णालयाकडे विशेष लक्ष ठेवतात. अशात वैद्यकीय अधीक्षक साळुंखे, ज्ञानेश्वर घुडे, आशिष गावंडे, भरत भगत व आधिपरिचारिकांच्या उपस्थितीत तत्काळ वॉटर कूलर लावून नागरिकांसाठी सेवा उपलब्ध करून दिली आहे.