Ticker

6/recent/ticker-posts

रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडला



                             [ महसूल पथक रात्रीची गस्त घालत दबंग कार्यवाही ]

सिंदखेडराजा :- ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेड राजा :- तालुक्यात रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडण्यात महसूल विभागाच्या पथकाला यश आले असून, टिप्पर किनगाव राजा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला. सिंदखेड राजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे.

 दरम्यान, तढेगाव ते हिवरखेड दरम्यान नदीपात्रामध्ये एक टिप्पर अवैध रेती भरताना महसूल विभागाच्या पथकाला दिसला आसता पथकाने हा टिप्पर व टिप्परमध्ये असलेली एक ब्रास रेती जप्त करून किनगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन केली. ही कारवाई नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, ग्राम महसूल अधिकारी श्रीमंत पांडव, गोरख पवार, विष्णू थोरात, महसूलसेवक मदन वायाळ, संजय आटोळे यांच्या पथकाने केली.