बिलोली प्रतिनिधी गणेश कदम.
बिलोली तालुक्यातील अटकळी येथील शेतकरी पुत्र चैतन्य मेहत्री हा दहावी शालात बोर्ड परीक्षेत ९६.४० टक्के गुण संपादित करत यश मिळवले आहे. अटकळी येथील शेतकरी पांडुरंग तुळशीराम मेहत्री हा आपल्या चैतन्य नावाच्या मुलाला नांदेड येथील राणी लक्ष्मीबाई विद्यालयात शिक्षणासाठी ठेवले मुलाने वडिलांच्या काबाडकष्टाची जाण ठेवून जिद्द व चिकाटीने अभ्यास करत दहावी बोर्ड परीक्षेत तब्बल 96.40 गुण घेऊन यश मिळवले आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल मुख्याध्यापक डॉ. शिवकुमार टाले, विष्णुपंत पुरणे, अनिल सुगावकर, संभाजी जोगदंड, सरपंच कुसुमताई बत्तलवाड, उपसरपंच रणवीर डोंगरे, माजी सरपंच पुष्पाताई घोडके, शिवाजी पाटील डोंगरे, बालाजी घोडके यांनी अभिनंदन केले.





Social Plugin