बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सेवागिरी विद्यालयाचे दहावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले . कु. सानिका किशोर जगदाळे ९७.८० टक्के,कु. तेजश्री अनिल जगदाळे ९६.६० टक्के, कु. साक्षी दिपक मोरे ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम तीन क्रमांकाच्या यशाचे मानकरी ठरले आहेत.
गुणवत्ता विकास हा एकच ध्यास या शाळेत शिक्षणाबरोबर विविध उपक्रमांची राबवणूक करून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देण्याचा अखंड प्रयत्न चालू असतो.विद्यालयाचा निकाल ९८.४३ टक्के लागला. निकालात ८० टक्के पेक्षा अधिक ४३ विद्यार्थी, तर ९०% पेक्षा अधिक गुण १० विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहेत.यशस्वी विदयार्थ्यांचे मुख्याध्यापक ए. बी, सावंत पर्यवेक्षक सौ. एस. यु. डुबल , स्थानिक स्कूल समिती, शाळा व्यवस्थापन समिती, गुरुकुल विभाग, माता पालक संघ शिक्षक पालक संघ व शाळेतील सर्व शिक्षक व सेवक वर्ग पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.





Social Plugin