राजकुमार चिंचोळकर बाळापूर
मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने लिंबू बगीच्याला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे या मध्ये चक्रीवादळा प्रमाणे वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने तालुक्यातील वाडेगाव.तामसी.चिंचोली. नाकाशी सह आदी गावातील कांदा. आंबा तसेच लिंबू बगीच्याला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने लिंबू बगीच्यातील लिंबू ची झाडे उन्मळून पडली त्याचप्रमाणे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या चे चित्र निर्माण झाले आहे तसेच परिसरातील झाडांला लागलेले आंबे सुध्दा गळून पडल्याने संमधीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे
तर तालुक्यात लिंबू पीकाची लागवड अधिक प्रमाणात असुन यावर्षी खरीप व रब्बी हंगामात सतत वातावरणात होणाऱ्या फेरबदलामुळे लिंबू च्या झाडांना फुल व फळधारणा अत्यंत अल्प प्रमाणात असल्याने त्याचा लिंबू उत्पादनावर अधिक प्रमाणात परिणाम होवून उत्पादनात मोठी घट निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लिंबू उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे तर निसर्गाच्या अवकृपेमुळे कांदा. आंबा. तसेच लिंबू बगीच्यासह मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येवून मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
यावर्षी लिंबू उत्पादनात मुळ मोठ्या प्रमाणात घट झाली आहे तर निसर्गाच्या अवकृपेमुळे वादळीवाऱ्यामुळे लिंबू झाडाचे नुकसान झाले आहे काही ठिकाणी झाडेच उन्मळून पडली तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.-अरुण हुसे लिंबू उत्पादक शेतकरी
Social Plugin