Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा लाड येथे ऑटोची एस. टी.बसला मागून धडक



बस चालकाची पोलिसात तक्रार


पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा : धावत्या एस. टी. . बसलाऑटोने बसला ऑटोने मागून धडक दिल्याची घटना १८ मे रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास बस स्थानक जवळच्या नालंदा सर्विस केंद्र समोर घडली.प्राप्त माहितीनुसार, वणी जि. यवतमाळ आगाराची एस. टी. बस (एम एच १४ एमएच ११५९) घेऊन चालक अंकुश तुकाराम बुंदे (३०) हे अकोला येथून वणी येथे कारंजा व्हाया चालले होते. ही बस येथील MH 14

स्थानकावर येत असताना मार्गात ऑटोने (एमएच ३७ जी ९९६) बसला मागून धडक दिली. ज्यामध्ये एस. टी. बसचे बफर घासून किरकोळ स्वरूपात नुकसान झाले.दरम्यान, ही घटना घडताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काहीवेळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. कारंजा शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाहतुकीचा तिढा सोडवला. याप्रकरणी बस चालकाने ऑटो चालकाविरुद्ध शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे